Ad will apear here
Next
गणेशमूर्तींवरील जीएसटी हटविण्याची मागणी
मुंबई : लोकसभेत २८ जुलै रोजी झालेल्या कामकाजात खासदार धनंजय महाडिक यांनी, गणेशमूर्तीवर आकारण्यात आलेल्या ‘जीएसटी’ला जोरदार विरोध दर्शवला.

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत खासदार महाडिक म्हणाले, ‘कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने होते. तसेच संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. सर्व जातिधर्मांचे लोक या उत्सवात हिरिरीने सहभागी होतात. अशा परिस्थितीत देवदेवतांच्या मूर्तींवर २८ टक्के जीएसटी आकारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे गणेशमूर्ती महागणार आहेत. प्रत्येक वर्षी मूर्तीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात आठ ते १० टक्के वाढ होते. अशातच जीएसटी लागू झाल्यामुळे मूर्तींचे दर खूपच वाढणार आहेत.’ १५ फुटी गणेशमूर्तीची किंमत २५ ते ३० हजार रुपयांनी वाढणार असल्याचे उदाहरण त्यांनी सभागृहाला दिले.

हा प्रश्न सर्वसामान्यांच्या आस्था आणि भावनेचा असल्याचे नमूद करून, खासदार महाडिक यांनी जीएसटी लागू करण्याच्या या निर्णयाला विरोध दर्शविला. ‘विशेषतः महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रत्येक गावात आणि शहरात त्यासाठी तरुण मंडळे कार्यरत असतात. या सर्वांनाच या निर्णयाचा फटका बसणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

‘मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ, पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणेश मंडळ आणि कोल्हापुरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे. बहुतांश मंडळांनी आणि गणेशभक्तांनी मे आणि जून महिन्यातच मूर्तीची नोंदणी केली आहे; पण जुलैनंतर जीएसटी लागू झाल्यामुळे, या सर्व भक्तांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. देवाची मूर्ती ही श्रद्धा आणि आस्थेची बाब असून, मूर्तींवर लादलेला जीएसटी तत्काळ हटवावा,’ अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी लोकसभेत केली. ‘संबंधित खात्याकडे आपल्या भावना पोहोचवू,’ असे अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले.
यापूर्वी मूर्तींवर कोणताही अतिरिक्त कर लागू नव्हता; पण जीएसटी समितीने गणेशमूर्ती, तसेच इतर देवदेवतांच्या मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय, कराच्या आधिपत्याखाली आणला असून, उच्चतम अर्थात २८ टक्के कर लागू केला आहे. त्यामुळे भाविक आणि मूर्तिकार या दोन्ही घटकांना फटका बसणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RYYRBE
Similar Posts
‘कामगारांना सामाजिक सुरक्षा, किमान वेतन मिळावे’ नवी दिल्ली : असंघटित क्षेत्रातील देशातील ३० कोटीहून अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा, किमान वेतन मिळावे, अशी आग्रही मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी ३१ जुलै रोजी लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात केली. सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाजात, ईएसआय आणि डी. जी. फासली या संस्थांतर्गत झालेल्या सामंजस्य कराराबाबत चर्चा झाली
पुणे व कोल्हापूर येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या पदनिर्मितीस मंजुरी मुंबई : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे आणि कोल्हापूर येथे मंजूर केलेल्या ट्रॉमा केअर सेंटरसाठी आवश्यक असलेल्या ९२ पदांची निर्मिती करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या पदांमध्ये दोन्ही केंद्रांसाठी नियमित स्वरूपाची
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language